Chandrashekharbavankule:मुख्यमंत्री कोण होणार हे दिल्लीतून ठरणार; फडणवीसांच्या 'त्या' विधानावर बावनकुळेंचे भाष्य



ब्युरो टीम:मागील काही दिवसांपासून भाजपा आणि शिंदे गटात मुख्यमंत्री पदावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून ते अचानक आपल्या गावी निघून गेले, असेही म्हटले जात आहे.

अशी एकंदरीत स्थिती असताना देवेंद्र फडणवीस यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असणारे बॅनर नागपुरात झळकले आहेत. यावरून आता भाजपा आणि शिंदे गटातील धुसफूस बाहेर येताना दिसत आहे. दरम्यान, २०२४ मधील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच असणार असल्याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले. मात्र वर आता भाजपमधून प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या या विधानावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी वेगळी भूमिका घेतली आहे. नेतृत्व कुणी करायचं, याचा निर्णय आज घेतला जाऊ शकत नाही. याचा निर्णय केंद्रातील ज्येष्ठ नेत्यांकडून घेतला जातो, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, "याचा निर्णय आज घेतला जाऊ शकत नाही. यावर केंद्रीय संसदीय बोर्डाकडून निर्णय घेतला जातो. कोणत्या आमदाराला किंवा खासदाराला उमेदवारी द्यायची? कुणाला मंत्री बनवायचं? कुणाला मुख्यमंत्री बनवायचं? पार्टीचा अध्यक्ष कुणाला बनवायचं? हे सर्व निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाकडून घेतले जातात. हे निर्णय चंद्रशेखर बावनकुळेंच्या अधिकारक्षेत्रात येत नाहीत."असेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर दुसरीकडे बावनकुळेंना प्रत्युत्तर देताना दीपक केसरकरयांनी, "मला वाटतं की, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या बाजुनेच बोललं पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पक्षाने सांगितल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदही मोठ्या मनाने स्वीकारलं. त्यांचं मन एवढं मोठं आहे. त्यांनी आज स्वत:च जाहीर केलं की, २०२४ च्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल. त्यामुळे माझी खात्री आहे की, चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात निश्चितपणे फरक आहे."असे त्यांनी म्हटले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने