ब्युरो टीम : शब्दधन काव्य मंच पिंपरी चिंचवड यांचे वतिने साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रतिभा कॉलेज येथे ८९व्या मराठी साहित्य संमलनाचे अध्यक्ष मा डॉ श्रीपाल सबनिस व सौ.ललिता सबनीस यांचे हस्ते कवयित्री शामला पंडित (दीक्षित ) यांना "छावा काव्य पुरस्कार " प्रदान करण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कवी, कवयित्री यांना शब्दधन प्रतिभा पुरस्कार, कवी अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार आणि छावा काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कवयित्री शामला पंडित (दीक्षित ) यांचे ३ चारोळी संग्रह, १२ कविता संग्रह, भावदर्पण कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी शामलाक्षरी हा नवकाव्य प्रकार निर्माण करून साहित्याला देणगी दिली आहे. समान दोन शब्द, अर्थ भिन्न असलेले दोन शब्द वापरून शामलाक्षरी काव्य रचना केली जाते. थोड्या कालावधीमध्ये शाम लाक्षरी काव्यप्रकार लोकप्रिय झाला आहे. विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी यासाठी हा काव्यप्रकार खूप उपयुक्त व आनंदी असा आहे. शामलाक्षरी काव्यामुळे निश्चितच वाचन संस्कृती वाढेल यात शंका नाही. त्यांनी "दिलदार मैत्री " या कवितेचे सादरीकरण केले. शामलाताईंची कविता भावसर्मपण करणारी व संस्कृती जपणारी आहे असे प्रतिपादन मा.डॉ.श्रीपाल सबनिस यांनी केले. प्रणाली प्रकाशनामार्फत अनेक पुस्तके प्रकाशित होत आहेत. प्रणाली प्रकाशनच्या माध्यमातून अनेक संग्रह प्रकाशित व्हावे असे आशीर्वाद उभयतांनी दिले. दिलासा व शब्दधनचे मा.सुरेश कंक, मा.प्रकाश घोरपडे, मा.सुभाष चव्हाण, मा.तानाजी एकोंडे या सर्वांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
मा.नंदकुमार मुरडे , मा.मधुश्री ओव्हाळ ' मा.श्रीकांत चौगुले मा . कांकरीया सर इ. मान्यवार उपस्थित होते. मा.प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचलन केले. मा.नामदेवराव चौधरी यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा