Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्रींचे शिर्डीच्या साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...



ब्युरो टीम : बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांनी शिर्डीच्या साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. 'गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही, पूजा करायचीच असेल तर हिंदू धर्मात संत कमी आहेत का?,' असा सवाल करत धिरेंद्र शास्त्री यांनी साईबाबांवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ ही व्हायरस झाला आहे. त्यामुळं आता यावरून नव्या वादाला तोंड फुटले असून शास्त्री यांच्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध करण्यात येतोय.

मध्यप्रदेशातील जबलपूर येथील कार्यक्रमात बोलताना बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री म्हणाले की, 'हिंदू धर्माचे शंकराचार्य यांनी साईबाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. त्यामुळं आपल्याला शंकराचार्यांचं मत मानणं गरजेचं आहे. याशिवाय त्यांच्या मतांचं पालन करणं हे प्रत्येक सनातनी व्यक्तीनं कर्तव्यच समजायला हवं. सनातनी धर्माचे शंकराचार्य हे पंतप्रधान आहेत. त्यामुळं कोणत्याही संतांना (साईबाबांना) ईश्वराचं स्थान देता येणार नाही.

साईबाबांबद्दल पुढे बोलताना धिरेंद्र शास्त्री म्हणाले की, 'गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही, संतांची पूजा करायचीच असेल तर हिंदू धर्मामध्ये संत कमी आहेत का?, साईबाबा हे संत असू शकतात, फकिर असू शकतात. परंतु ते ईश्वर होऊ शकत नाही. कारण गिधाडाची चामडी पांघरून कोणी सिंह होत नाही,' असं शास्त्री यांनी म्हटलं आहे. 'कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत. काही लोक याला वादग्रस्त वक्तव्य म्हणतील, परंतु यावर बोलणं फार गरजेचं आहे,' असंही त्यांनी म्हटलं आहे.

पहा व्हायरल व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने