Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक



ब्युरो टीम : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणात अटक करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सन २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी तोंड बंद ठेवण्यासाठी एका अडल्ट चित्रपट अभिनेत्रीला पैसे दिल्याच्या आरोप असून या  प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

हा खटला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी ऑक्टोबर २०१६ च्या अखेरीस डॅनियल्सला त्याच्या तत्कालीन वैयक्तिक वकील मायकेल कोहेनच्या वतीने यूएस डॉलर १३०,००० इतक्या पेमेंटशी संबंधित आहे. एका दशकापूर्वी ट्रम्प यांच्याशी असलेल्या कथित संबंधांबद्दल त्यांनी कोणताही खुलासा करू नये म्हणून डॅनियल्स यांना ही रक्कम कथितरित्या देण्यात आली होती. ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, ट्रम्प यांना या प्रकरणी जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने