Eknath Shinde : आयोध्येहून येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिली आनंदाची बातमी; अयोध्यत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन बांधणार

 


 ब्युरो टीम: अयोध्या दौऱ्यावरून मुंबईत परत येताचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोध्येत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन बनवण्याची  मोठी घोषणा केली आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मी भेटलो, त्यांनी स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांसह विविध योजनांबद्दल चर्चा झाली. तसेच महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणावर रामभक्त अयोध्येला जातात. त्यांची योग्य सोय तिकडे झाली पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जागा देण्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे लवकरच आयोध्येमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतल्यावर राम भक्तांना दिली.

अयोध्येतील राम मंदिर हे भारतीयांसाठी अस्मिता असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. राम मंदिर हे स्वप्नवत होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा राम मंदिराचे स्वप्न पाहिलं होतं, असे शिंदे म्हणाले. राम जन्मभूमीत वेगळंच वलय जाणवल्याचं शिंदे म्हणाले. आजचा दिवस माझ्या जीवनातील सौभाग्याचा दिवस आहे. मी आजचा दिवस कधीच विसरु शकणार नाही, असंही शिंदे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने