Election: माजी
मुख्यमंत्र्याची मुले एकमेकांविरूद्ध लढणार, एकाला भाजपने तर
दुसऱ्याला काँग्रेसने दिली उमेदवारी
ब्युरो टीम: सत्तेच्या मोहासाठी
माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात आता उभी फूट पडली आहे. पुरोगामी जनता दलाचे नेते
असलेले एस.बंगारप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. ते निवडून येत असलेल्या शिवमोग्गा जिल्ह्यातील सोरब मतदार
संघातून कुमार आणि मधू ही त्यांची मुले निवडणुकीत आमने सामने उभी ठाकली आहेत.
विशेष बाब ही आहे की एस.बंगारप्पा यांचा मुलगा कुमार बंगारप्पा हा भाजपमधून निवडणूक लढवत आहे तर त्याच्याविरोधात त्याचा भाऊ मधू याला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. कुमार याने 2018 साली भाजपमध्ये प्रवेश केला होता तर मधू याने 2021 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या दोघांनीही यापूर्वी आमदारकी भूषवलेली आहे. कुमार याने तर मंत्रीपदही भूषवलेले आहे.
एस.बंगारप्पा यांचे निधन
झाले असून सोरब मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. 1967 ते 1994 या काळात ते या
मतदारसंघाचे आमदार होते. बंगारप्पा यांची दोन्ही मुले म्हणजेच कुमार आणि मधू हे
राजकारणात येण्यापूर्वी चित्रपटसृष्टीत उतरली होती. या दोघांनीही चित्रपटांमध्ये
अभिनय केला आहे. मधू याने चित्रपटाची निर्मितीही केली आहे.
चित्रपटानंतर या दोघांनी
राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला होता. एस.बंगारप्पा यांना खासदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर
त्यांचा मुलगा कुमार हा 1996 साली आमदार झाला होता. 1999, 2004 आणि 2018 साली त्याने आमदारकीची निवडणूक जिंकली होती. त्याने
मंत्रीपदही भूषविले होते. 2013 साली कुमार याला त्याचा भाऊ मधू याने पराभूत
केले होते. हे दोन्ही भाऊ पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले असून ही लढत कर्नाटकातील
प्रमुख लढतींपैकी एक आहे. कुमार याला भाजपने उमेदवारी दिली आहे तर मधू याला
काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा