Gautami patil : चक्क बैलासमोर गौतमी ठेका, कारणही होतं खास

 


ब्युरो टीम: गौतमी पाटील कायम चर्चेमध्ये असते. तिच्या अनेक कार्यक्रमात प्रेक्षकांनी राडा घातल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. मात्र आता गौतमी पाटील ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

तीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती बैलासमोर नाचताना दिसत आहे. मुळशीतील एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमातील हा व्हिडीओ असल्याचं समोर आलं आहे. बैलासमोर डान्स लग्नानिमित्त आयोजित मांडव टिळा कार्यक्रमात चक्क बैलासमोर गौतमी पाटील नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरलं झाला आहे.

पूर्वीच्या काळी लग्नाआधी दाराबाहेर मांडव घालण्याची प्रथा होती, त्या मांडवात नवऱ्या मुलाची वाजत गाजत बैलगाडीतून मिरवणूक येत असे. हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी मिरवणूक न काढता गीतांचा कार्यक्रम ठेवला आणि बैलगाड्याचं प्रतीक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभा केल्याचं आयोजक राजेंद्र हगवणे यांनी म्हंटलय आहे.

मात्र कारण काहीही असो गौतमी बैलासमोर नाचते म्हंटल्यावर ते बघायला हजारोच्या संख्येने नागरिकही जमा झाले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, या व्हिडीओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

राडा अन् गौतमीचा कार्यक्रम गौतमीचा प्रत्येक कार्यक्रम हा सध्या चर्चेचा विषय बनत आहे, तिच्या अनेक कार्यक्रमामध्ये तरुणाईने गोंधळ घातल्याचा, राडा केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. आता गौतमी पाटील चक्क बैलासमोर नाचत असल्याचा व्हिडीओ व्हायरलं झाल्यानं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने