ब्यूरो टीम:- माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एखाद्या ठिकाणाहून निवडून येऊन खासदार होऊन दाखवावे, असे आव्हान राज्याचे ग्रामविकास आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिले.
ते जळगावातील एका
कार्यक्रमात बोलत होते. घोडा मैदान आता जवळ आहे, स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत.
वर्षभरात लोकसभेच्याही
निवडणूक आहेत, लोकसभेच्या निवडणुकीला तुम्ही उभे राहा आणि एकदा अनुभव घ्या, महाविकास आघाडीचा
एवढा जर जोर असेल, तर पृथ्वीराजबाबांनी एखाद्या ठिकाणहून खासदार
होऊन निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान महाजन यांनी दिले.
आपण बोलताना जरा विचार
करुन बोलत जा एवढा सल्ला मी देईन. परंतु त्यांचा आणि विचारांचा काही संबंध नाही, तोंडाला येईल तसे
बोलत राहतात, काहीही बरळत राहतात, महाराष्ट्रातील जनतेचा
विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही. लोक एक करमणूक म्हणून आणि जोकर म्हणून
त्यांच्याकडे बघत असतात, अशी खोचक टीकाही गिरीश महाजन यांनी संजय राऊत
यांच्यावर केली.
टिप्पणी पोस्ट करा