Government:राज्याचे मुख्य सचिव होणार मनोज सौनिक



ब्युरो टीम: राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. येत्या रविवारी मनोज सौनिक 46वे मुख्य सचिव म्हणून कार्यभार स्वीकारतील. राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

या पदासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर ही नावे चर्चेत होती. यातून मनोज सौनिक यांची वर्णी लावण्यात आली. सुजाता सौनिक या सध्या सर्वात ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत. आता मनोज सौनिक यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पत्नी सुजाता सौनिक यांना संधी मिळू शकते असे सांगण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने