hanuman jayanti ranegoan: राणेगाव येथील नवसाला पावणारा मारोती हे अविचल श्रद्धेचे प्रतिक ; श्री क्षेत्र पवनसूत हनुमानासह गावचा इतिहास .....



अनिरुध्द तिडके: शेवगाव तालुक्यातील मौजे राणेगाव येथील श्री क्षेत्र पवनसूत हनुमान या नावाने तसेच नवसाला पावणारा मारोती म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द असे देवस्थांन असलेल्या पावनसूत हनुमानाची चैत्र पौर्णिमेला  भरणारी यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. मारोती म्हणजे कल्याण पवित्र् मंगलमय संकटमोचन व भयापासून रक्षा करतात आणी आपण केलेला नवस हा मारोती पूर्ण करतो असा आत्मानुभव येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये दिसून येतो. गावोगावी हनुमान मंदिरांना शिखर व कळस असतात परंतु हे महाराष्ट्रातील एकमेव हनुमान मंदिर आहे की, या हनुमान मंदिराला शिखर व कळस नाही. हा मारोती पारावर बसलेला आहे. जुनी म्हातारी लोक अख्यायका सांगतात की, या मारोतीला शिखराचे व कळसाचे काम करता येत नाही. किंवा तसा बांधण्याचा प्रयत्न ही केला तरी ते बांधकाम टिकत नाही. हा मारोती स्वयंभू आहे. हजारो वर्ष जुनी व सुंदर आणी आकर्षक अशी हनुमानाची मूर्ती आहे. या देवस्थांनाच्या पंचक्रोशीला रामायण कालखंडात दंडकआरण्या असे संबोधले जात होते. याचे इतिहास कालीन पुरावे आजही जिवंत आहे.

 राणेगावच्या पूर्व बाजूला काशी केदारेश्वर हे देवस्थान आहे या ठिकाणी प्रभू राम आणी सीतेचे वास्तव्य होते त्याचा निशाण्या आणी पुरावे म्हणून आजही त्या ठिकाणी जाते सीतेची न्हाणी सापडते पाण्यासाठी रामाने बाण मारून पाण्याचा झरा तयार केला तो ही आज त्याच्या वास्तव्याची साक्ष देत आहे. याचं काशी केदारेश्वर पासून ३ किलोमीटर अंतरावर नागलवाडी हे गाव आहे या गावात प्रसिद्ध रसायन तज्ञ नागअर्जुन यांची प्रयोगशाळा या ठिकाणी होती या गावापासून पूर्वेला ४ किलोमीटर अंतरावर धौम्यागड आहे. याच गडाचे पुढे भगवानगड म्हणून नामकरण झाले. या गडावर महाभारत कालीन पांडवाचे गुरु धौम्यऋषी यांची समाधी आहे. पुढे मातोरी या गावी रामायण कालीन शबरी मातेची समाधी आहे. राणेगाव पासून १ किलोमीटर अंतरावर पश्चिमेले सृंगेरी हे गाव आहे या गावात श्रुंग ऋषी यांची समाधी आहे यावरून या गावाला श्रुंगेरी हे नाव पडले या नावाचा अपभ्रउंस होऊन पुढे याला शिंगोरी हे नाव झाले. सदैव श्रीराम सेवेत तत्पर असणारे हनुमानजी पारावर विराजमान झालेले पाहून भक्तांना नवल वाटते.

 मौजे राणेगाव मधील ग्रामस्थांनी हॉस्पिटल, प्राथमिक माध्यमिक शाळा, जुनिअर कॉलेज, विठ्ठल मंदिर, राम मंदिर, ऋषी मंदिर, देवी मंदिर, महादेवाचे मंदिर, पर्यटन स्थळ, पुष्प वाटिका यांच्या निर्मितीचा संकल्प राष्ट्रीय आणी समाजिक उन्नतीसाठी राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातून केला आहे. श्री क्षेत्र पावनसूत हनुमान म्हणून या देवस्थांची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे आणी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जात आहे. या देवस्थानाला दर शनिवारी व प्रत्येक महिन्याच्या आमावश्याला हनुमान भक्तांची दर्शनासाठी गर्दी असते मनोकामना पूर्ण करणारा नवसाला पावणारा मारोती हे अविचल श्रद्धेचे प्रतिक आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने