ब्युरो टीम: शरीर आरोग्यदायी ठेवण्यासाठी शरीराला आवश्यकता
असते ती प्रोटीनची. प्रोटीनमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि रक्तातून शरीराला पुरेसा
ऑक्सिजन पुरवठा येते. त्यामुळे आपले तंदुरुस्त शरीर बनवण्यासाठी प्रोटीन फायदेशीर
ठरतात. प्रोटीनमुळे शरीरातील अँटीबॉडी बनवण्यास मदत होते, ज्यामुळे संसर्ग आणि आजारांविरोधात लढण्याची शरीराची क्षमता
वाढते. परंतु रोज शरीराला किती प्रोटीनची आवश्यकता असते याची आपण माहिती घेऊ.
यूएस डिपार्टमेंट ऑफ
अॅग्रीकल्चरच्या अहवालानुसार, प्रत्येक
व्यक्तीला त्याच्या वजनानुसार रोज विविध प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते. 4 वर्षाच्या मुलासाठी रोज 13 ग्रॅम प्रोटीन तर 14 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांसाठी तसेच मुलींसाठी 46 ग्रॅम प्रोटीनची गरज असते. याशिवाय 14 ते 18 वर्षीय तरुणांसाठी रोज 52 ग्रॅम प्रोटीनची
आवश्यकता असते. हे प्रोटीन कुठून मिळते ये आपण जाणून घेऊयात.
फळातून प्रोटीन –
प्रोटीनचा सर्वात मोठा स्त्रोत चिकन, मासे, अंडी, दाळ आणि बीन्स असतात. परंतु, अन्य पदार्थांतूनही चांगले प्रोटीन मिळते,
ज्यात शेंगदाणे, पनीर, दूध याचा समावेश
आहे. फळ शक्यतो प्रोटीनच्या यादीत येत नाही. परंतु, तरीही असे काही फळ आहेत जे तुम्हाला चांगल्या प्रमाणात
प्रोटीन देतात. आपल्याकडे अनेक जण शुद्ध शाकाहारी असल्याने ते मांस खात नाहीत.
त्यांच्यासाठी या फळांमधून प्रोटीन मिळवणे सोपे आहे.
उपवासाला साबुदाणा खाताय?
तुम्हाला ‘हे’ आजार असतील तर खाणे टाळा!
एवोकाडो –
एवोकाडो एक सूपरफूड आहे
आणि कप एवोकाडोमध्ये जवळपास 4 ग्रॅम प्रोटीन
असते. याशिवाय एवोकाडोमध्ये सर्व प्रकारची पोषक तत्व असतात, जे शरीराला आरोग्यदायी बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
किवी –
किवी हे फळ लहान
मुलांसाठी खूप फायदेशीर ठरते. एक कप किवीमध्ये 2.1 ग्रॅम प्रोटीन मिळते. याशिवाय यात व्हिटॅमिनचे प्रमाणही
भरपूर असते. किवी थेट किंवा त्याची स्मूदी बनवूनही खाता येते.
ब्लॅकबेरी –
ब्लॅकबेरीमध्ये
प्रोटीनशिवाय व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम सारखे पोषक तत्व मोठ्या प्रमाणात
आहेत. एक कप ब्लॅकबेरीमध्ये जवळपास 2 ग्रॅम प्रोटीन मिळते. यात फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्सचे प्रमाण भरपूर आहे.
फणस –
फणसाची भाजी करून देखील
खाली जाते, किंवा फळ म्हणून आपण फणस
नेहमीच खातो. या सर्व प्रकारची तत्व असतात, जे शरीराला मजबूत करतात. एक कप फणसामध्ये जवळपास 3 ग्रॅम प्रोटीन असते. याशिवाय फणसामध्ये
व्हिटॅमिन सी आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते.
पेरू –
एक कप पेरूच्या गरामध्ये 4.2 ग्रॅम प्रोटीन असते. अन्य फळांच्या तुलनेत हे
अधिक आहे. या फळात व्हिटॅमिन सीचे प्रमाणही भरपूर असते. पेरू कच्चा किंवा त्याची
स्मूदी बनवून खाऊ शकतात. पेरूमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट आणि फायबर
असते.
टिप्पणी पोस्ट करा