Indian Army Recruitment: भारतीय सैन्यात नोकरीची संधी; 'या' जागांसाठी भरतीची मोठी घोषणा



ब्युरो टीम: इंडियन आर्मीने पात्र, अविवाहित पुरुष इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना जानेवारी 2024 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे सुरू होणार्‍या 138 व्या टेक्निकल ग्रॅज्युएट्स कोर्ससाठी (TGC-138) अर्ज करण्यास अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

हा कोर्स भारतीय सैन्यात पर्मनंट कमिशनसाठी आहे. या भरती मोहिमेत एकूण 40 जागा भरल्या जातील. सिव्हिल आणि कॉम्प्युटर सायन्स या स्ट्रीममधील उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. या संदर्भात 'स्टडी कॅफे'ने वृत्त दिलंय.

पदांची नावं व रिक्त जागा भारतीय सैन्याने वेगवेगळ्या स्ट्रीमच्या इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्ससाठी अर्ज मागवले आहेत. यात एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत. पात्रतेचे निकष परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराने काही निकष पूर्ण करणं आवश्यक आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एकतर ते भारताचे नागरिक किंवा नेपाळचे नागरिक असावे.

या शिवाय जे लोक भारतात कायमस्वरूपी स्थायिक होण्याच्या उद्देशाने काही देशांतून स्थलांतरित झाले आहेत, तेही अर्ज करू शकतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणींमध्ये येणाऱ्या उमेदवारांसाठी, भारत सरकारने जारी केलेले पात्रतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. नेपाळमधील गुरखा समाजातील उमेदवारांना यातून सूट देण्यात आली आहे. दुसरे म्हणजे उमेदवार 1 जानेवारी 2024 पर्यंत 20 ते 27 वर्षांच्या वयोगटातील असावे.

म्हणजेच उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 1997 आणि 1 जानेवारी 2004 दरम्यान झालेला असावा.

75,000 रुपये पगार आणि कोणतीच परीक्षा नाही; 'या' महापालिकेत थेट मिळणार नोकरी; ही घ्या मुलाखतीची तारीख

शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी आवश्यक इंजिनिअरिंग डिग्री कोर्स पूर्ण केलेला असावा किंवा डिग्रीचं अंतिम वर्ष असावं. अंतिम वर्षात असल्यास, त्यांनी सर्व सेमिस्टर किंवा वार्षिक गुणपत्रिकांसह 1 जानेवारी 2024 पर्यंत डिग्री परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा प्रदान करावा लागेल. या श्रेणीतील उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) येथे प्रशिक्षण सुरू झाल्यापासून 12 आठवड्यांच्या आत इंजिनिअरिंग डिग्री सर्टिफिकेट सादर करणं आवश्यक आहे.

जे उमेदवार सर्टिफिकेट सबमिट करू शकणार नाहीत, त्यांना इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये (IMA) प्रशिक्षणाच्या खर्चाच्या वसुलीसाठी अॅडिशनल बाँड बेसिसच्या आधारावर समाविष्ट केले जाईल. त्यांना वेळोवेळी स्टायपेंड, वेतन व भत्ते दिले जातात. वेतन लेफ्टनंट लेव्हल 10 ला दरमहा 56,100 इतका तर COAS लेव्हल 18 ला दरमहा 2,50, 000 लाख रुपये पगार दिला जाईल. यामधील पोस्टवरील अधिकाऱ्यांना पोस्टच्या दर्जानुसार दरमहा पगार दिला जाईल.

 

याबाबतची सविस्तर माहिती उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेत वाचावी. मिलिटरी सर्व्हिस पे (MSP) हे भारतीय सशस्त्र दलातील सर्व अधिकाऱ्यांना दिले जाणारे अतिरिक्त पेमेंट आहे. अधिकाऱ्याच्या पदाच्या दर्जानुसार एमएसपीची रक्कम बदलते. निवड प्रक्रिया भारतीय सैन्यात अधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेसाठी अनेक टप्पे असतात.

सर्वात आधी प्रत्येक इंजिनिअरिंग स्ट्रीमसाठी गुणांच्या कटऑफ टक्केवारीच्या आधारे अर्ज निवडले जातील, जे अंतिम सेमिस्टर किंवा वर्षापर्यंत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या एकत्रित टक्केवारीवर लागू केले जातील. हे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना SSB मुलाखतीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल. दुसरं म्हणजे, अर्जातून शॉर्टलिस्ट केल्यावर त्यांना मेल करून सेंटर अलॉट केलं जाईल. तिसरे म्हणजे, कटऑफ टक्केवारीनुसार निवडलेल्या पात्र उमेदवारांचीच मुलाखत सायकॉलॉजिस्ट, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर व मुलाखत अधिकारी यांच्याद्वारे घेतली जाईल.

उमेदवार दोन टप्प्यांतील निवड प्रक्रियेद्वारे निवडले जाईल. जे स्टेज-1 पास करतील, ते स्टेज-2 मध्ये जातील. पण स्टेज-1 मध्ये नापास झालेले या प्रक्रियेतून बाहेर होतील. स्टेज -2 मधील उमेदवारांची मेडिकल टेस्ट होईल.यात पास होणाऱ्या उमेदवारांना ट्रेनिंगचं जॉइनिंग लेटर दिलं जाईल.

अर्ज कसा करायचा -अधिकृत वेबसाईटला भेट द्या. - 'Officer Entry Apply/Login' वर जाऊन 'Registration' वर क्लिक करा.

आधीच रजिस्टर केलं असेल तर ही स्टेप स्कीप करा. - सर्व इन्स्ट्रक्शन्स नीट वाचून ऑनलाइन फॉर्म भरा. - नोंदणी केल्यावर डॅशबोर्डवर 'Apply Online'ला क्लिक करा. - त्यानंतर 'Officers Selection Eligibility' नावाचे पेज उघडेल.

टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससमोर दाखवलेल्या 'Apply' वर क्लिक करा. - नंतर 'Application Form' नावाचं पेज उघडेल, तिथले इन्स्ट्रक्शन्स वाचून 'Continue' वर क्लिक करा व आवश्यक माहिती भरा. - यामध्ये वैयक्तिक माहिती, कम्युनिकेशन डिटेल, शैक्षणिक डिटेल्स, एसएसबी डिटेल्स भरून पुढे जाताना 'Save & Continue' वर क्लिक करा. - शेवटच्या सेगमेंटमध्ये डिटेल्स भरल्यावर तुम्ही 'Summary of your information' पेजवर पोहोचाल.

तिथे तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला पडताळता येईल. ते केल्यावर 'Submit'वर क्लिक करा.- कोणत्याही डिटेल्स एडिट केल्यावर प्रत्येकवेळी 'Submit'वर क्लिक करणं आवश्यक असेल. - शेवटच्या दिवशी फायनल क्लोजर झाल्यानंतर 30 मिनिटांनंतर उमेदवारांनी त्यांच्या रोल नंबर असलेल्या अर्जाच्या दोन कॉपी काढणे आवश्यक आहे. - ऑनलाइन अर्ज 18 एप्रिल 2023 वाजता दुपारी तीन वाजेपासून ते 17 मे 2023 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत करता येईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने