ब्युरो टीम: तुमच्याकडे व्हिडिओग्राफीचं कौशल्य असेल,
तुम्ही त्यासंबंधी शिक्षण घेतलं असेल आणि
नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण दूरदर्शनमध्ये
व्हिडिओग्राफर या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
हे पद पूर्ण वेळ
कराराच्या आधारे भरले जाणार असून त्याचा कालावधी दोन वर्षांपर्यंत असेल. या
पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराचं पोस्टिंग दिल्ली येथे केलं जाणार आहे. `स्टडी कॅफे डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे. प्रसार भारती दूरदर्शन
न्यूजने व्हिडिओग्राफर या पदासाठी अनुभवी आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले
आहेत.
या पदाच्या भरतीसंदर्भात
दूरदर्शनने अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं आहे. या अधिकृत नोटिफिकेशननुसार, दूरदर्शनमध्ये व्हिडिओग्राफर या पदासाठी 41 रिक्त जागा आहेत. या पदांसाठीची अर्ज
प्रक्रिया 18 एप्रिल 2023 पासून सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज सादर
करण्याची अंतिम तारीख नोटिफिकेशनच्या तारखेपासून 15 दिवसांपर्यंत आहे.
अंतिम तारखेनंतर प्राप्त
झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
DRDO मध्ये नोकरभरती,
अडीच लाखांपेक्षा जास्त पगार, कसा करायचा अर्ज पाहा
व्हिडिओग्राफर पदासाठी
अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे कमाल वय 18.04.2023 रोजी 40 वर्षापेक्षा कमी
असावे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 रुपये मासिक मानधन देण्यात येणार आहे. या पदासाठी
उमेदवाराची नियुक्ती पूर्णवेळ कराराच्या आधारे केली जाणार असून, ही निवड दोन वर्षांसाठी असेल.तसेच निवड
झालेल्या उमेदवारांचं पोस्टिंग नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.
व्हिडिओग्राफर पदासाठी
काही शैक्षणिक निकष निश्चित करण्यात आले आहेत. दूरदर्शनच्या अधिकृत
नोटिफिकेशननुसार, या पदासाठी
इच्छुक उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10+2 उत्तीर्ण असावा. तसेच त्याने मान्यताप्राप्त विद्यापीठ
किंवा संस्थेतून सिनेमॅटोग्राफी/ व्हिडिओग्राफी या विषयात पदविका किंवा पदवी
मिळवलेली असावी. मोजोमधील अनुभव असलेल्या आणि शॉर्ट फिल्म मेकिंग कोर्स केलेल्या
उमेदवाराला प्राधान्य दिलं जाईल.
इच्छुक उमेदवाराला
व्हिडिओग्राफी, सिनेमॅटोग्राफी
किंवा अन्य समकक्ष क्षेत्रातील कामाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असावा.
व्हिडिओग्राफर पदासाठी योग्य उमेदवाराची निवड ही बेसिक टेस्ट, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाईल. केवळ निवड
झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा चाचणीसाठी बोलवलं जाईल. चाचणी/मुलाखतीला
उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
दूरदर्शनच्या अधिकृत नोटिफिकेशनुसार, व्हिडिओग्राफर पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंतिम तारखेपूर्वी अधिकृत
वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज सबमिट करण्यात काही अडचण आल्यास,
त्रुटीच्या स्क्रीनशॉटसह hrcell413@gmail.com
वर उमेदवार ईमेल करू शकतात
टिप्पणी पोस्ट करा