ब्युरो टीम:. येत्या 20 एप्रिलला
माघारीच्या अंतिम दिवशी घडणाऱ्या घडामोडीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपचे
आमदार राम शिंदे, राष्ट्रवादीचे
आमदार रोहित पवार यांच्यामुळे चुरशीच्या आणि अटीतटीच्या निवडणूका होतील, अशी चिन्हे दिसू लागली असताना आता रत्नदिपचे
अध्यक्ष डॉ. भास्करराव मोरे यांनी यात उडी घेतली आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी
होणार की तिरंगी याबाबत उत्सुकता आहे. कृषी उत्पन्न बाजार
समितीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू असून, उमेदवारी अर्जांच्या संख्येवरून इच्छुकांची गर्दी मोठ्या
प्रमाणात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे
जामखेड बाजार
समित्यांवरील आतापर्यंतच्या राजकीय वर्चस्वाचा विचार केल्यास बाजार समितीवर माजी
मंत्री आ. राम शिंदे यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यावेळी रत्नदीप मेडिकल कॉलेजचे
अध्यक्ष भास्करराव मोरे यांनी स्वतंत्र पॅनल उभा करून आपले अस्तित्व दाखवून दिले
होते. याहीवेळी डॉ. मोरे यांच्याकडून गुप्तपणे राजकीय खेळी खेळली जाणार असल्याचे
बोलले जात आहे. मात्र आताच्या निवडणुकीत भाजपचे आ. राम शिंदे व राष्ट्रवादीचे
आमदार रोहित पवार, डॉ. भास्करराव
मोरे यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.
तीनही नेत्यांचे
राज्यपातळीवर वर्चस्व असल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची
ठरणार आहे. बाजार समितीत भाजपसह राष्ट्रवादीचे दिग्गज कार्यकर्ते निवडणूक रिंगणात
आहेत. त्यामुळे अधिकच प्रतिष्ठेची ठरणार आहे. बाजार समितीवरील आतापर्यंत असलेले
भाजपचे वर्चस्व शाबूत राहते, की आमदार रोहित
पवार हे आपले वर्चस्व सिद्ध करतात, त्यात डॉ.
भास्करराव मोरे काय जादू करतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
बाजार समितीची निवडणूक
राष्ट्रवादी कॉंग्रेसने गांभीर्याने घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत बाजार समितीत राष्ट्रवादीची सत्ता
आणण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. डॉ. भास्करराव मोरे हे भाजप, राष्ट्रवादीकडून चित्र स्पष्ट होताच आपला बॉंब
फोडणार असल्याची चर्चा तालुक्यात आहे. अभ्यासू उमेदवाराचा प्रयत्नचतालुक्यात
शेतीमाल बाजाराचा अभ्यास करणारे अनेकजण आहेत. मात्र, त्यांचे राजकीय वजन नसल्याने ते निवडणुकीसाठी इच्छुक नाहीत.
ज्यांचे राजकीय वजन आहे, त्यांचा अभ्यास
असो अथवा नसो, पक्षाचा व
नेत्याच्या जवळचा म्हणून गेल्या वर्षभरापासून ते इच्छुक असल्याचे सांगत
निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.दुसरीकडे अभ्यासू उमेदवार शोधण्याचा प्रयत्नच
राहून गेला.
बाजार समित्यांसाठी अर्ज
दाखल करण्यास सुरुवात होत असताना दुसरीकडे पॅनल निर्मितीसाठी राजकीय घडामोडींना
वेग आला आहे. पॅनलच्या नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. रिंगणात
उतरण्यासाठी इच्छुकांची गर्दी झाल्याने आमदार रोहित पवार यांच्यासह आमदार राम
शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे, यात काही शंका
नाही.
टिप्पणी पोस्ट करा