Kokan: कोकणातील तरूणांना रोजगार मिळणार? कोकणातील बीचवर उभारणार शॅक्स; पर्यटनात गोव्याची जागा कोकण घेणार

 


ब्यूरो टीम: गोव्यातील बीचवर पर्यटकांसाठी बांधण्यात येणारे शॅक्स आता आगामी काळात कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरही दिसणार आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील 8 समुद्रकिनाऱ्यांवर हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.

महाराष्ट्रातील बीचवर पर्यटनास चालना देण्यासाठी शॅक उभारण्याच्या धोरणास मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड या चारही जिल्ह्यांमध्ये शॅक्स उभारले जाणार आहेत. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यातील 8 किनाऱ्यांवर पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे.

रत्नागिरीतील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्गातील तारकर्ली, कुणकेश्वर, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा आणि बोर्डी या ठिकाणी हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. इतर किनाऱ्यांवरही टप्प्याने याची कार्यवाही केली जाणार आहे.

 

दरम्यान, शॅक्स उभारण्यासाठी काही नियमही केले आहेत.

एका किनाऱ्यावर जास्तीत जास्त 10 शॅक्स उभारता येतील

यातील 80 टक्के रोजगार स्थानिकांना द्यावे लागतील

शॅक्सचे वाटप तीन वर्षांसाठी असेल

शॅकसाठी पहिल्या वर्षी 45 हजार, दुसऱ्या वर्षी 50 हजार, तिसऱ्या वर्षी 55 हजार शुल्क असेल

सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेतच शॅक सुरू ठेवता येतील

प्रत्येक शॅकमध्ये सीसीटीव्ही ठेवावा लागेल

संगीताचा त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने