Kolhapur : ऋतुराज पाटलांचा अमल महाडिक यांना टोला; करेक्ट सव्वा सातलाच आलो, मात्र महाडिक घाबरले;



ब्युरो टीम: श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या कोल्हापूर सुरू असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आमदार सतेज पाटील आणि महाडिक गटाकडून सुरू आहे.

आतापर्यंत हिंम्मत असेल तर बिंदु चौकात या असे आव्हान अनेक राजकारन्यांनी अनेकांना दिले आहेत. पण काल प्रत्यक्षात हे आव्हान पाटील आणि महाडिक गटाने स्विकारले. त्यापद्धतीने आंबेडकर जयंती दिवसी माजी आमदार अमल महाडिक यांनी बिंदू चौकात आले. त्यांनी आपण आलो पण त्यांची वाट बघतोय.

आज आम्ही घाबरलेलो नाही ते आम्हाला भ्याले आहेत, असा घणाघात केला. तर काही वेळातच आमदा ऋतुराज पाटीदेखील येथे आले आणि त्यांनी महाडिक यांच्यावर टीका केली. करेक्ट सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान मी दसरा चौकात आलो होतो. मात्र महाडिक यांनी सत्तेचा गैरवापर करत पोलिसांमार्फत आम्हाला तेथे थांबवल्याचे म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने