ब्युरो टीम: केंद्रातील भाजप
सरकारविरोधात विरोधकांची एकजूट करण्यासाठी दिल्लीत वेगवान घडामोडी घडत आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या
गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, 2024 साठी 'एक जागा, एक उमेदवार' असा फॉर्म्युला, अशी योजना नितीशकुमार यांच्याकडून आखली जात असल्याचे जेडीयूच्या
एका वरिष्ठ नेत्यांने सांगितले.
जे पक्ष काँग्रेस आणि
भाजपपासून अंतर राखून आहेत त्यांना एकत्र आणण्याचे कामही नितीशकुमार करणार आहेत.
तसेच नितीश यांनी ममता बॅनर्जी, के. चंद्रशेखर
राव आणि डाव्या पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली आहे. काँग्रेसने शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे), झारखंड मुक्ती
मोर्चा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना सोबत घेण्याची
जबाबदारी घेतली आहे.
टिप्पणी पोस्ट करा