Maha vikas aghadi : महाविकास आघाडीत बिघाडी? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही शेतकरीविरोधी'; नाना पटोले



ब्युरो टीम:  गोंदिया जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती करून उमेदवार उभे केले आहे. जी भाजप दररोज शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युती करून लढत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही शेतकरीविरोधी ठरतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

केंद्र सरकारने अगदी वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. देशाच्या सीमा बंद केल्या पाहिजेत. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे बाहेर देशातून येणाऱ्या प्रत्येताची चाचणी, तपासणी केली पाहिजे. पण केंद्र सरकार आजघडीला याकडे दुर्लक्ष करीत आहे, असं नाना पटोले म्हणाले.

शरद पवार यांनी अदानी प्रकरणी संयुक्त समितीची गरज नसल्याची भूमिका जाहीर केली. ती त्यांच्या पक्षाची भूमिका असू शकते, आमची नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अदानीविरोधात संयुक्त संसदीय समितीचे गठण करण्यात अडचण काय? शरद पवार यांनी अदानी समूहाची पाठराखण केली, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे, असंही नाना पटोले म्हणाले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने