Mahavikasaaghdi: वज्रमुठ सभेसाठी महाविकास आघाडी सज्ज; संयुक्त सभेसाठी छत्रपती संभाजीनगर सज्ज

 


ब्युरो टीम: महाविकाघाडीच्या विरत वज्रमुठ सभेला परवानगी मिळाली असून त्यासाठी १५ अटीचे पालन करण्याचे सांगण्यात आले आहे. रामनवमीच्या उत्सवानिमित्त झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या यता सभेत महाविकास आघाडीचे नेते शिंदे- फडणवीस सरकारवर कसा प्रहर करतात ते पाहण्यासाठी रविवार, 2 एप्रिल रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या विशाल मैदानावर संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकगर्दी करणार असल्याचे सांगण्यात येत आहेत.  छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या  महाविकास आघाडीच्या पहिल्याच सभेची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

या सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मार्गदर्शन करणार आहेत. सगळीकडे चर्चा फक्त सभेचीच असून 'चलो मराठवाडा सांस्कृतिक मंडळ' असे फलक जागोजागी लागले आहेत.

या सभेला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार संजय जाधव, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विधान सभेतील गटनेते बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, खासदार रजनी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे, संजय बनसोडे, खासदार फौजिया खान आदी उपस्थित राहणार आहेत.

महाविकास आघाडीच्या सभेसाठी संपूर्ण मराठवाडय़ातून लोक येणार असून त्याचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. शांतता आणि शिस्तीत ही सभा होणार असून गर्दीचे अनेक विक्रम मोडित निघणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवानी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने