ब्युरो टीम: फुरसुंगी -वडकी
येथील ऐतिहासिक मस्तानी तलाव खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नाने पर्यटन
क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. तलावाच्या संवर्धनासाठी 25 लक्ष रुपयांची विकासकामे मंजुर करण्यात आली आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे
मस्तानी तलावाच्या मालकीची कोणत्याही शासकीय विभागाकडे नोंद नव्हती, त्यामुळे विकास करताना तांत्रिक अडचणी येत
होत्या. तलावाचा 7/12 भूमि अभिलेख
विभागाकडून लवकरच मिळेल, त्यामुळे या
परीसराचा सर्वागीण विकास करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे व
आमदार संजय जगताप यांच्या प्रयत्नातून वडकी गावात विविध विकासकामांचा शुभारंभ
आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी तेबोलत होते. यावेळी वडकीचे सरपंच अरुण गायकवाड, बाळासाहेब साबळे, पंडीतदादा मोडक सर्व ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित
होते.
वडकी येथील भैरवनाथ
मंदिरासमोरील विकासकामांचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. यामध्ये महादेव मंदिर
येथील ओढ्यावर साकव बांधणे,भुमिगत गटारे,
अंतर्गत रस्ते, सामाजिक सभागृह बांधकाम, काळभैरवनाथ मंदिरासमोर व्यासपिठ व खुले रंगमंच सभागृह
बांधकाम करणे, मुस्लिम दफनभुमीस
सुरक्षाभिंत बांधणे आदी कामांचा समावेश आहे. वडकीतील अन्य कामांसाठीही निधी उपलब्ध
होणार असल्याचे सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा