Men Urinate : पुरुषांनी बसून लघवी करावी की उभं राहून? वाचा


 

ब्युरो टीम : पुरुष अनेकदा उभं राहून लघवी करतात. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्येही पुरुषांना उभं राहूनच लघवी करण्याचा पर्याय असतो. मात्र, काही काळापूर्वी तज्ज्ञांनी पुरुषांना उभे राहून लघवी करण्याबद्दल चेतावणी दिली होती. तज्ज्ञांच्या मते, ’पुरुषांनी उभे राहण्याऐवजी बसून लघवी करावी. बसून लघवी करण्याची सवय असेल तर त्याचे अनेक फायदे मिळू शकतात.’ नेदरलँड्स मधील डॉक्टरांना असं आढळून आलं आहे की,’लघवी करण्यासाठी बसणे पुरुषांसाठी, विशेषतः ज्यांना प्रोस्टेटच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. कारण उभं राहण्याऐवजी बसून लघवी जास्त जोराने बाहेर पडते.’

‘एनएचएस’च्या मते, ‘लघवी करताना जर मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नसेल, तर अशावेळी मुत्राशयात खडे तयार होऊ शकतात.’ याबाबत तज्ज्ञांनी सांगितलं की, ‘मूत्रपिंड मूत्र तयार करण्याचं काम करतात. हे तुमच्या किडनीने तुमच्या रक्तापासून वेगळ्या केलेल्या पाणी आणि टाकाऊ पदार्थांनी बनलेलं असतं. टाकाऊ पदार्थांपैकी एक म्हणजे युरिया असून जो नायट्रोजन आणि कार्बन पासून तयार होतो. जर तुमच्या मूत्राशयात थोडीशी सुद्धा लघवी उरली असेल, तर युरियामध्ये असलेली रसायने एकत्र चिकटून क्रिस्टल्स बनतात. कालांतराने, हे क्रिस्टल्स कठोर होतात, ज्यामुळे मूत्राशयात खडे तयार होतात.’ 

तर, डॉक्टरांच्या मते, ‘जर तुम्ही उभं राहून लघवी करत असाल, तर त्यामुळे तुमच्या ओटीपोटाचे आणि मणक्याचे स्नायू आकुंचन पावतात.’ 2014 च्या अभ्यासात तज्ज्ञांनी सांगितलं की, ‘अनेक वर्षांपासून लोक बसून लघवी करत आहेत. जेव्हा लोक बसतात तेव्हा पेल्विस आणि हिप मसल्सला आराम मिळतो, व यामुळे लघवी करणं सोपं होतं.

.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने