mpsc: एमपीएससीत अनिकेत माने-देशमुख राज्यात पहिला



ब्युरो टीम: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

त्यात आण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी येथील अनिकेत सिद्धेश्‍वर माने-देशमुख याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

त्याला मुख्य परीक्षेत 200 पैकी 151.50 गुण मिळाले. वेळापूर, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असलेला माने डॉ. आण्णासाहेब शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयात एमटेकला आहे. त्याने कृषी अभियांत्रिकी फोरम राहुरी येथे राहून अभ्यास केला. त्यांनी कृषी अभियांत्रिकी फोरमची परीक्षेतील निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. त्याबद्दल फोरमद्वारे त्यांचा आज सत्कार करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने