Myanmar : धक्कादायक! म्यानमार सैन्याकडून एका गावावर एअर स्ट्राईक

 


ब्युरो टीम : म्यानमार मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मान्यमार सैन्याने मंगळवारी (११ एप्रिल) एका गावावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लहान मुलं, पत्रकारांसह एकूण १०० लोकांचा मृत्यू झालाय. या गावात म्यानमारच्या विरोधी गटाच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक सहभागी झाले होते. म्यानमारमधील स्थानिक असणाऱ्या एफपी न्यूजने याबाबत वृत्त दिलंय. या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे.

एफपी न्यूजनुसार, म्यानमार सरकारने या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. म्यानमार सैन्याने या मृत्यांना सरकारविरोधी संघटना जबाबदार असल्याचा आरोप केलाय. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, म्यानमार सैन्याच्या फायटर जेटने मंगळवारी सकाळी ८ वाजता १५० लोक जमा झालेल्या ठिकाणी बॉम्ब टाकला. या हल्ल्यात जवळपास १०० लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सरकारविरोधी गटाच्या स्थानिक नेत्यांसह सामान्य महिला नागरिक आणि २०-३० लहान मुलांचाही समावेश आहे. एअर स्ट्राईकनंतर एक दीड तासाने एका हेलिकॉप्टरने गोळीबार केला. म्यानमार सरकारने या हल्ल्याचं वार्तांकन करण्यास मनाई केल्याने या हल्ल्यात नेमके किती मृत्यू झालेत याचा निश्चित आकडा समोर येऊ शकलेला नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने