...
ब्युरो टीम : भाजप आमदार नितेश राणे यांनी नगरमधील कापड बाजारात चौक सभेत भाषण करताना नगर महापालिका प्रशासनावर जोरदार निशाणा साधला. काही अधिकारी अल्पसंख्याकांची बाजू घेत आहेत. त्यांना खुर्ची ठेवणार नाही. तुम्हाला कोण वाचवितो ते पाहतोच, अशा शब्दात त्यांनी एकप्रकारे प्रशासनाला इशाराच दिला आहे.
नगरमध्ये काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण झाली होती. या व्यापाऱ्याची भेट घेण्यासाठी राणे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नगरमध्ये आले होते. त्यांनी हॉस्पिटलमध्ये जखमी व्यापाऱ्याची भेट घेतली. तसेच रामवाडी, वारुळवाडी घटनेतील लोकांचीही भेट घेतली. त्यांनी कापड बाजारात पाहणी करून येथील चौकात सभा घेतली. ते म्हणाले, ‘हिंदू व्यापाऱ्यांना टार्गेट करण्याचे काम नगरमध्ये सुरू आहे. व्यापाऱ्यांना मारहाण करणारे शहरात अतिक्रमण करून हिंदूंवर अन्याय करतात. त्यांचे रक्षण करणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. पण पोलिस ते करीत नाहीत. पण आता मी त्यांना सांगतो की, सरकार बदललेले आहे. त्या लोकांना वाचविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ड्यूट्या आता कोण वाचवितो, तेच मी पाहतो,’ असेही ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा