Once again vikhe vs pawar : बाजार समितीच्या निवडणुकीनंतर सुजय विखेंचे रोहित पवारांना थेट आव्हान, म्हणाले...



विक्रम बनकर, नगर : महाराष्ट्राच्या राजकारणात पवार विरुद्ध विखे असा संघर्ष काही नवीन नाही. त्यातच आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्यानंतर नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जत येथील बाजार समितीचा सभापती भाजपचाच होणार, असे सांगत एक प्रकारे आमदार रोहित पवार यांना आव्हानच दिले आहे. त्यामुळे कर्जत येथील बाजार समितीच्या सभापतीपदी आपल्याच  पक्षाचा उमेदवार बसावा, यासाठी भाजप व महाविकास आघाडी या दोघांकडून ही रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार या दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने चुरशीच्या ठरलेल्या कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटाला समसमान म्हणजे प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. कर्जतकरांनी दोन्ही आमदारांवर विश्वास टाकून समान जागा दिल्या असल्या तरी आता सभापतीपदाच्या निवडणुकीत  बहुमतासाठी फोडाफोडीमुळे पुन्हा पुढील राजकारण रंगणार आहे.

कर्जत येथे दोन्ही गटाला समसमान जागा मिळाल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनीही माध्यमांशी बोलताना कर्जत मध्ये भाजपचा सभापती होणार, असे जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे आता रोहित पवार यांना आव्हानच दिले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात येथे सभापती कोण होतो, ते पाहावे लागेल.

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने