विक्रम बनकर अहमदनगर :डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासन व मंडळांच्या पदाधिकार्यांची बुधवारी (दि.12) कोतवाली पोलीस ठाण्यात बैठक पार पडली. पोलीस प्रशासनाकडून काही महत्त्वाच्या सूचना यावेळी मंडळांना देण्यात आल्या. मिरवणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात राहणार असून सीसीटीव्ही कॅमेरे मिरवणूक मार्गावर बसविण्यात आले.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा-
मिरवणूक मार्गावर महत्त्वाची चौक वादविवाद झालेली अंतर्गत ठिकाणी अशा 45 ठिकाणांवर 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. यामध्ये मिरवणुकीत तसेच मिरवणूक मार्गावर येणारे रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे सर्वच गोष्टींवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे.
प्रकाशव्यवस्था -
अहमदनगर महापालिकेकडे पत्रव्यवहार करून कोतवाली पोलिसांनी मिरवणूक मार्गावरील बंद असलेले दिवे सुरू करणेबाबत कळविले त्यावरून महापालिका आयुक्त श्री जावळे साहेब डांगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्री कोके यांच्या टीम ने बंद असलेले पथदिवे सुरू केले आहेत तसेच आवश्यक त्या ठिकाणी नवीन पथदिवे लावलेले आहेत काम सुरू आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांना सुद्धा पत्रव्यवहार करून मिरवणूक सुरू असताना यंत्रणा सतर्क ठेवणे बाबत कळविलेले आहे. कोतवाली पोलिसांकडून काही महत्त्वाच्या ठिकाणी लाईट गेल्यास स्वतंत्र प्रकाश व्यवस्था केलेली आहे.
पक्के बॅरिकेटिंग-
गेल्या काही मिरवणुकांपासून कोतवाली पोलिसांनी मिरवणूक पुढे जात असताना अडथळा येऊ नये वाद होऊ नये यासाठी पत्र्याचे तसेच लाकडी पक्के बॅरिकेटिंग चांगल्या पद्धतीने करण्यास सुरुवात केलेली आहे. आंबेडकर जयंती मध्ये सुद्धा पक्के बॅरिकेटिंग करण्यात येत असून जागोजागी आतील बाजूने सुद्धा बॅरिकेटिंग करून बंदोबस्त लावण्यात आला आहे.
प्रवेश बंदी केलेले मिळून आल्यास होणार कारवाई-
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले तसेच वेळोवेळी मिरवणुकांमध्ये व इतर वेळेस वाद केलेले गुन्हे दाखल असलेल्या 86 जणांवर अहमदनगर शहरांमध्ये व परिसरामध्ये प्रवेश बंदी करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले आहेत. अशा व्यक्तींना दिनांक 13 एप्रिल चे रात्री सायंकाळी सहा ते पंधरा एप्रिल सकाळी दहा वाजेपर्यंत नगर शहरांमध्ये प्रवेश बंदी केलेली आहे. हे इसम पोलिसांना मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सोबतच 30 लोकांवर इतर प्रतिबंधक कारवाई केलेली असून 75 लोकांना नोटीस दिले आहेत.
प्रमुख पदाधिकारी व मंडळाचे पदाधिकारी यांचे मीटिंग-
आंबेडकर जयंती ची मिरवणूक शांततेत पार पाडावी सर्व मंडळांच्या काही अडीअडचणी असतील त्या जाणून घेण्यासाठी कोतवाली पोलीस स्टेशन येथे सर्व मंडळाचे प्रमुख तसेच पदाधिकारी इतर पदाधिकारी यांची अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोतवाली पोलिसांकडून मीटिंग घेण्यात आली. सदर मीटिंगमध्ये सुद्धा यापूर्वी ज्या मुद्द्यांवरून वाद झालेला असे मुद्दे टाळून त्याप्रमाणे मिरवणूक शांततेत काढण्यावर चर्चा झाली.
पोलीस बंदोबस्त-
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघणार असल्याने तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते दिल्लीगेट पर्यंत पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस उपाधीक्षक, अकरा पोलीस निरीक्षक, 25 पोलीस उपनिरीक्षक, 425 पोलीस जवान, एक शीघ्रकृतिदल, एक एस आर पी टीम अशी यंत्रणा तैनात करण्यात आलेले आहे.
पोलिसांचे आवाहन -
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक मोठ्या प्रमाणावर निघणार आहे कोणीही अनुचित प्रकार करत असल्यास किंवा करण्याच्या बेतात असल्यास तात्काळ कोतवाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे 7777924603 फोनवर संपर्क करून किंवा 112 या क्रमांकावर फोन करून तात्काळ कळवावे. शांततेत मिरवणुका पार पाडाव्यात.
टिप्पणी पोस्ट करा