ब्युरो टीम : प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधत देशातल्या वाघांची संख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर केली. देशात ३ हजार १६७ वाघ आहेत. १ एप्रिल १९७३ ला जिम कॉर्बेट अभय अरण्यातून इंदिरा गांधींनी प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. त्यावेळी म्हणजे १९७३ मध्ये वाघांची संख्या २६८ होती. मात्र आता ही संख्या ३ हजार १६७ झाली आहे. देशभरात ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत.
१ एप्रिल १९७३ ला इंदिरा गांधी यांनी हा प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. वाघ वाचवण्यासाठी ही मोहीम होती. कारण तेव्हा भारतात २६८ वाघ उरले होते. १९ व्या शतकाच्या सुरूवातीला भारतात ४० हजार वाघ होते. मात्र १९७३ मध्ये ही संख्या २६८ इतकीच उरली होती. त्यामुळे ही संख्या वाढवण्यासाठी टायगर प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. २००६ मध्ये १४११ एवढी वाघांची संख्या झाली. तर २०१० मध्ये ही संख्या १७०६ इतकी झाली. २०१४ मध्ये ही संख्या २२४६ झाली. तर २०१८ मध्ये वाघांची संख्या २९६७ इतकी झाली होती. दरम्यान, देशातल्या वाघांची संख्या जगातल्या वाघांच्या संख्येच्या तुलनेत ७० टक्के अधिक आहे. मात्र आजही वाघांवर संकट आहे. वाघाचं रक्षण करायचं असेल तर जंगल आणि इतर जिवांचं रक्षण करणं आवश्यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा