Pune mp election : भाजप देणार स्वरदा बापट यांना उमेदवारी? इच्छुक बंडखोरी करणार का की तलवार म्यान?




ब्युरो टीम: खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी काही नावे चर्चेत आहेत. पण कसब्यात मुक्ता टिळकांच्या निधनानंतर त्यांच्याच घरातील उमेदवार न देणं भाजपला महागात पडलं होतं. त्यामुळे बापटांनंतर त्यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बाकी इच्छुक उमेदवार बंडखोरी करतात का आपली तलवार म्यान करतात याची चर्चा शहरात रंगली आहे.

सध्या भाजपकडून पाच नावांची चर्चा आहे. त्यात भाजप आता बापटांच्या घरात उमेदवारी देणार का? उमेदवारी दिली तर बापटांचा वारस कोण? अशा चर्चा राजकीय क्षेत्रात रंगू लागल्या आहे. मात्र, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी टिळक कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यावेळी भाजप सावध खेळी खेळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुक्ता टिळकांच्या कुटुंबियांना भाजपने पोटनिवडणुकीवेळी उमेदवारी नाकारली होती. त्यावरुन राजकारण पेटलं होतं. अनेकांनी टीका केली होती. टिळक कुटुंबियांंनीदेखील नाराजी खुलेपणानं बोलून दाखवली होती. त्यांना उमेदवारी नाकारुन भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. सगळी फौज कामाला लावली होती. मात्र, तरीही कसब्यात भाजपचा पराभव झाला. कसबा पेठेत उमेदवार निवडताना आमची चूक झाली असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी म्हटले होते. म्हणजेच कसब्याच्या पराभवातून भाजप धडा घेणार का?, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

गिरीश बापट यांच्या निधनानंतर बापट कुटुंबातील कोणाला उमेदवारी देणार याचा चर्चा सध्या रंगल्या आहे. गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट, सून स्वरदा बापट, मुलगा गौरव बापट यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, मुलगा गौरव राजकारणात फारसा सक्रिय नाही. त्यामुळे पत्नी किंवा सून या दोघींपैकी एक उमेदवार असू शकतो. सुनेला राजकारणाचा अनुभवदेखील आहे.

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून सध्या पाच नावे चर्चेत आहेत. गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, संजय काकडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नावे चर्चेत आहेत. 







0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने