pune university: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी १६ जणांनी दाखल केले अर्ज



ब्युरो टीम: माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा कार्यकाळ मे २०२२ मध्ये संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज करण्याची मुदत ३० मार्च राेजी संपली. या पदासाठी १६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. एप्रिल अखेर नव्या कुलगुरूंची निवड होण्याची शक्यता आहे.

कुलगुरू निवड समितीमध्ये अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अभय करंदीकर, दीपक कपूर, डॉ. मीना चंदावरकर (युजीसी प्रतिनिधी) यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अर्जांमधून पात्र उमेदवारांच्या एप्रिल महिन्यांत मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यातून निवडलेल्या पाच उमेदवारांची कुलगुरू मुलाखत घेतील आणि त्यातून एकाची कुलगुरू पदावर निवड करणार आहेत

महाविकास आघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात केलेल्या बदलांना राज्यपालांनी मान्यता न दिल्याने कुलगुरू निवड प्रक्रिया रखडली हाेती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्य शासनाने विद्यापीठ कायद्यातील प्रस्तावित बदल रद्द केले. जानेवारी २०२३ मध्ये मुंबई, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीची स्थापना केली आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या समितीने ३० मार्चपर्यंत कुलगुरूपदासाठी अर्ज करण्यास मुदत दिली हाेती.

कुलगुरूपदासाठी इच्छुक डाॅ. संजीव साेनवणे, डाॅ. विजय खरे, डाॅ. प्रफुल्ल पवार, डाॅ. अंजली कुरणे, डाॅ. राजेश गच्छे, डाॅ. विलास खरात, सुरेश गाेसावी, अविनाश कुंभार यांच्यासह १६ उमेदवारांनी कुलगुरूपदासाठी अर्ज केले आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने