Pune university :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संयुक्त जयंती महोत्सव संपन्न



ब्युरो टीम : दिनांक ११ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान महात्मा फुले आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती विद्यापीठात साजरी करण्यात आली . ४ दिवशीच्या महोत्सवामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या महोत्सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . कारभारी काळे यांनी केले . यामध्ये तीन दिवस व्याख्यानमाला , एक दिवस ' मी सावित्रीबाई फुले बोलतेय..' हा एकपात्री प्रयोग , दुसऱ्या दिवशी ' शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला ' या नाटकाचा प्रयोग तसेच तिसऱ्या दिवशी ' विद्यार्थी जलसा' संपन्न झाला . १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी सकाळी विद्यापीठात संविधान प्रास्ताविकेची भव्य मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाच्या माध्यमातून उत्तम सादरीकरण केले .

चार दिवसीय महोत्सवात वैचारिक , प्रबोधनभर तसेच मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजान ' संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी , प्राध्यापक तसेच इतर कर्मचारी वर्गाचा सहभाग होता. मा. कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी व्याख्यानमालेचा समारोप केला . तर बक्षीस वितरण माजी कुलगुरू डॉ , नरेंद्र जाधव यांच्या हस्ते पार पडले. अशी माहिती विदयापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी दिली.

                    



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने