Pune University:पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार ;विद्यापीठाच्या कॕलेडर मध्ये पुन्हा एकदा चूक



ब्युरो टीम: विद्यापीठाच्या कलेडर मधील नवनवीन  चुका सातत्याने समोर  येत आहेत .  सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीच्या तारखेचा  घोळ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा तसाच प्रकार समोर आलो आहे .आज  4 एप्रिल रोजी भगवान  महावीर यांची जयंती आहे . कलेडर मध्ये महावीर यांच्या फोटो ऐवजी गौतम बौद्ध यांचा फोटो लावला गेला  आहे .गेल्या काही दिवसांमध्ये  जाणूनबुजून महापुरूषाची बदनामी करण्याचे काम विद्यापीठ प्रशासन करत आहे . महापुरूषांची बदनामी करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनांचा जाहीर निषेध केला.

काल दिनांक ३ एप्रिल रोजी शिवसेना व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने संबंधित चुक दुरूस्त करून संबंधित जबाबदार अधिकारी वर्गावर कारवाई  करण्याच्या मागणीचे पत्र कुलसचिव यांना दिले आहे . यावेळी निवेदन देताना युवासेना पुणे शहर अधिकारी -  राम थरकुडे, शहर समन्वयक -  युवराज पारीख, नारायण चापके, लकी परमार, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष  कृती समिती चे राहुल ससाणे तसेच माजी सिनेट सदस्य मा. संतोष ढोरे उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने