Pune :सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार-चंद्रकांतदादा पाटील यांचे आश्वासन

 


ब्युरो टीम :कोथरुड मधील सोसायट्यांना सोलार, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करण्याची ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज संवाद साधून, समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या सह नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे व इतर मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या अडचणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सांगितल्या. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, कचरा संकलन, रस्ते दुरुस्ती आदींचा समावेश होता. या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर, तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 

यासोबतच सोसायटींनी ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण सोलार पॅनल बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करु, असे आश्वास्त केले. त्यासोबतच प्रत्येक सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड नॅपकीन आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवून देण्याची ग्वाही दिली. तसेच, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सोसायट्यांनी पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने