punempelecttion :धंगेकर पुन्हा कसब्याची पुनरावृत्ती करतील का? पुणे लोकसभेसाठी मविआ मोठी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात,



ब्यूरो टीम: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. आता पुण्यात येत्या सहा महिन्यात लोकसभेची पोटनिवडणूक होईल, अशी शक्यता आहे. यासाठी मविआ आणि भाजपाकडून सध्या कोणाला उमेदवारी दिली जाणार याची चर्चा रंगतेय. कसब्याच्या पोटनिवडणूकीनं महाविकास आघाडीतील सगळेचं पक्ष भाजपाला रोखू शकतो असा आत्मविश्वास आला. त्यामुळेच येत्या सगळ्या निवडणुका मविआ एकत्र लढेल असं जवळपास सगळेच नेते एकमुखानं सांगताना दिसतायेत.

 या सगळ्या राजकीय परिस्थितीत पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. आता पुण्यात येत्या सहा महिन्यात लोकसभेची पोटनिवडणूक होईल, अशी शक्यता आहे. यासाठी मविआ आणि भाजपाकडून सध्या कोणाला उमेदवारी दिली जाणार याची चर्चा रंगतेय. त्यातच कसब्यात भाजपा आणि शिंदे गटाचा दारुण पराभव करणाऱ्या रवींद्र धंगेकरांनाच पुन्हा लोकसभेसाठी उभं करण्यात येईल, अशी चर्चा सध्या सुरुये. कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या विजयात रवींद्र धंगेकरांच्या जनसंपर्काचा मोठा वाटा असल्याचं सगळेच जणं मान्य करतायेत. अशा स्थितीत पुन्हा त्यांना लोकसभेला संधी दिली तर विजयाची आशा मविआला वाटते आहे.

कसबा पोटनिवडणुकीत भाजपाच्या अजस्त्र यंत्रणेला रवींद्र धंगेकर एकटे पुरुन उरले. ही निवडणूक जनतेच्या हातात गेली होती, अशीच प्रतिक्रिया त्यांनी विजयानंतर दिली होती. चार वेळा नगरसेवक राहिलेले धंगेकर यांचा जनसंपर्क प्रचंड प्रमाणात असल्यानं त्यांच्या या प्रतिमेचा फायदा मविआला झाला. दुचाकीवर फिरणारे धंगेकर विरुद्ध भाजपा असा हा संघर्ष झाला आणि पेठांमधील मतदानही भाजपाऐवजी काँग्रेसच्या मतपेट्यांत गेलं. त्यामुळेच आता धंगेकरांना पुन्हा उमेदवारी दिल्यास त्याचा फायदा होईल, असं गणित मविआ मांडताना दिसतेय. तर दुसरीकडं धंगेकर यासाठी किती उत्सुक आहेत, याबाबत साशंकता व्यक्त होते आहे. विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात अंतराने बराच फरक असतो. केवळ प्रतिमेच्या जोरावर ही निवडणूक ते विजयी करु शकतील का, अशी शंका त्यांच्याही मनात असावी.

भाजपाकडून गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचबरोबर मुरलीधर मोहोळ, संजय काकडे यांच्याही नावाची चर्चा सुरुये. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भाजपा श्रेष्ठींची इच्छा आहे. मात्र निवडणूक झालीच तर तिकिट बापट यांच्या घरातील कुणाला दिल्यास सहानभूतीचा फायदा मिळण्याचीही शक्यता आहे. कसब्यात मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक यांच्या घरात उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यानं नाराजीचा फटका भाजपाला सहन करावा लागलाय. आता कसब्याप्रमाणेच पुणे लोकसभेची पोटनिवडणूकही प्रतिष्ठेची होणार की काय, याकडं सगळ्यांचं लक्ष असेल.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने