Puneuniversity: रिफेक्ट्रीमध्ये अतिरिक्त भाजी मागितली तर विद्यार्थ्यांना मोजावे लागते जास्तीची रक्कम

 


ब्युरो टीम: सावित्रीबाई फुले पुणे विद्यार्थ्यांच्या भोजनगृहात ( रिफेक्ट्री ) विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या  ताळीच्या किंमतीपेक्षा जास्त पैसे आकारले जात आहेत . यामध्ये थोडी जास्त  भाजी मागितली तर विद्यार्थ्यांना 10 रूपयांचे कूपन घ्यायला सांगितले जाते. तसेच चपाती पार्सल घेतली तर 5 ऐवजी 6 रूपये मोजावे लागतात . ही सरासर विद्यार्थ्यांची आर्थिक लूट असून संबंधित भोजनगृह मालकावर कारवाई झाली पाहिजे . या अगोदर वारंवार भोजनात आळया निघाल्यामुळे संबंधित मालकाची,हकलपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर मुलीच्या वसतिगृहामध्ये मेस चालवणार्या मालकास 1 महिन्याच्या कालावधीसाठी  तात्पुरत्या स्वरूपात मेस चालवण्यासाठीची परवानगी  दिली  गेली होती. असे असताना संबंधित मालकास कायमस्वरूपी कसे करण्यात आले ?  नवीन टेन्डर का काढले गेले नाही ?  तसेच भोजनगृहावर  लक्ष ठेवण्यासाठीची भोजनगृह समितीच्या स्थापनेचे  काय झाले ? इ. प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत .

 

कोट

१) आज सकाळी भोजनगृहात जेवण करण्यासाठी गेलो असता मी थोडी भाजी देता का ? असी विचारणा केली असता. मला 10 रूपयाचे कूपन घेऊन ये तरच भाजी देतो असे सांगितले गेले .

          सूरज कांबळे ( विद्यार्थी ) - 

२) रिफेक्ट्रीसह विद्यापीठाच्या सर्व भोजनगृहामध्ये चपाती ५ ऐवजी 6 रूपयांना दिली जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत . या गोष्टी बंद होणे आवश्यक आहेत . आम्ही वारंवार भोजनगृह,समितीची मागणी करतो आहोत . परंतु अजूनही समितीची स्थापना गेली केली नाही .

       राहुल ससाणे [ सदस्य - विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती ]

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने