puneuniversity: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह फोडले गेले आणि अधिकारी मात्र ड्रायफुड खाण्यात दंग



ब्युरो टीम:  आज सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची तोडफोड करण्यात आली . या घटनेचा विरोध आणि निषेध म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस निवेदन दिले. महाराजांचे नाव असलेल्या सभागृहाची तोडफोड करून बदनामी व अपमान ज्यांनी केला त्यांच्या विरोध करवाई करण्या संबंधिचे हे निवेदन होते. हे निवेदन देण्यासाठी प्रतिनिधी गेली असता एक अजब प्रकार दिसून आला ; सर्व अधिकारी मा. कुलगुरू , प्र. कुलगुरू , कुलसचिव मस्त काजू , बदाम , पिस्ता , इ. पदार्थ खात बसले आहेत.

 ऐतिहासिक अशी मुख्य इमारत व त्या इमारतीमधील महाराजांच्या नावे असणारे सभागृह फोडले गेले. परंतु त्याचे दुःख आणि गांभीर्य संबंधित अधिकारी वर्गास नसल्याचे दिसून येत आहे. ही बाब अतिशय लाजीरवाणी आहे असा संताप  विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी केला.  

        

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने