puneuniversity: मा. सुनील वारे ( महासंचालक - डॉ . बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ) यांची भेट


ब्युरो टीम:   बार्टी’ च्या  वतीने  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत पात्र ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय संशोधक विद्यार्थ्यांच्या व्यापक आंदोलनानंतर  सरकारने  घेतला आहे . त्यांदर्भात दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी  महासंचालक यांची विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे राहुल ससाणे, तुकाराम शिंदे सह विद्यार्थ्यांनी भेट घेतली .  

आंदोलन स्थळी पहिल्या दिवसांपासून उपस्थित असलेले व संपूर्ण आंदोलनाचे व्यवस्थित नियोजन करणारे #ईश्वरअडसूळ व त्यांच्या टीम सोबत मा. महासंचालक यांची भेट घेऊन त्यांचे व सरकारचे आभार व्यक्त केले . तसेच इतर काही  विद्यार्थी प्रश्नांवर बार्टीने असेच धोरनात्मक निर्णय घेऊन काम करावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली. येणाऱ्या काळात बार्टी विद्यार्थी हिताचे निर्णय घेईल अशी भूमिका मा. वारे सरांनी व्यक्ती केली. 

तसेच  २ मे पासून सर्व ८६१  विद्यार्थ्यांना fellowship award letter देण्याची प्रक्रिया चालू होईल अशी माहिती देखील  सरांनी यावेळी दिली . तसेच सरांनी  त्यांचा  " #आपणस्पर्धाजिंकतआहोत " हा ग्रंथ विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे राहुल ससाणे, तुकाराम शिंदे यांनी भेट म्हणून दिला. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने