ब्युरो टीम : गेल्या काही दिवसांत सातत्याने फुडमॉलमध्ये घाण दिसून येत आहे . याअगोदर काही दुकाने शौचालयाच्या जवळ शिळा भात उघड्यावर वाळू घालताना देखील दिसून आली होती . विद्यार्थ्यांना अस्वस्थ पदार्थ खाण्यासाठी दिले जात आहेत . तसेच फुडमॉलचा संपूर्ण परिसर हा स्वच्छ असतो. चहाचे कप , जेवणाची ताटे तसेच इतर खाण सर्व पडलेली असते. त्यावर माशा घोंगत असतात . आणि त्याच माशा खाद्य पदार्थावर बसतात . हे सर्व दुकानदार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत . जर एखाद्या विद्यार्थ्यांला विषबाधा झाली तर त्याला सर्वस्वी हे दुकानदार आणि विद्यापीठ प्रशासन असेल .
माझी विद्यापीठ प्रशासनास विनंती आहे की त्यांनी संबंधित दुकानदारावर सक्त कारवाई करावी . आणि तसेच सर्व विद्यार्थ्यांना देखील नम्र आवाहन आहे की त्यांनी देखील या गोष्टीचा जाहीर विरोध करावा . निषेध करावा . तरच आपल्याला चांगले स्वच्छ अन्न खाण्यासाठी मिळेल असे आवाहन विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे सदस्य राहुल ससाणे, तुकाराम शिंदे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा