ब्युरो टीम: विद्यापीठातील
काही संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तोडफोड केली. परंतु त्यांच्यावर
कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद झाली नाही. परंतु 2019 मध्ये विद्यापीठाच्या रिफेक्ट्री मध्ये भोजनाच्या
निकृष्ट दर्जा संदर्भात आंदोलन केले होते तेव्हा 12 विद्यार्थ्यांच्यावर गुन्हे
दाखल करण्यात आले होते.
आज छत्रपती शिवाजी महाराज
यांचे नाव असलेल्या सभागृहाची तोंडफोड करण्यात आली आहे. हा महाराजांचा अपमान आहे.
सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर विद्यापीठ कारवाई करणार का ? गुन्हे दाखल करणार का ? असा प्रश्न विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी उपस्थित केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा