ब्युरो टीम: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना रिपाइंमध्ये येण्याची ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
अजित पवार हे माझ्या
पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल. जर आम्हाला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली तर
आम्ही अजित पवारांना मुख्यमंत्री करू, असं रामदास आठवले म्हणाले आहेत. आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं एवढे आमदार
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जातील, पण उध्दव
ठाकरेंना कंटाळून ते आमदार शिंदे यांच्यासोबत गेले, असंही आठवले म्हणालेत. अदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरही
आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे मजबूत माणूस आहे. ते रडणार नाहीत.
असे आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे, असं ते म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा