Ravindra Dhangekar: अगं चंपाबाई..धंगेकरला जीव थोडा लाव.. या गाण्यानं पुण्यात धुरळा

 


ब्युरो टीम : पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गेल्या वेळेसप्रमाणे यावेळी धंगेकर यांचे नाव कोणत्या निवडणुकीमुळे नाही तर एका गाण्यामुळे चर्चेत आहे. आमदार धंगेकर यांच्यावर बनवलेले एक गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. “अगं चंपाबाई, धंगेकरला जीव थोडा लाव… मतानं कसा उधलून टाकलाय डाव” असे बोल असलेलया या गाण्याची पुण्यातील चौकाचौकात सध्या चर्चा आहे.

पुण्यातील गाजलेल्या आणि वाजलेल्या निवडणूकीचा धुरळा नुकताच शांत झाला. गेल्याच महिन्यात पुण्यामध्ये पोट निवडणुका झाल्या. यामध्ये कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरशीची लढत होती. यामध्ये धंगेकर यांनी मोठा विजय प्राप्त केला. हा विजय मोठा ऐतिहासिक होता. यावर आता एक भन्नाट गाणं आलं असून.. या गाण्याने कसब्यासह पुण्यामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

दरम्यान, एकीकडे राज्यात विविध रॅपर्सविरोधात कारवाई सुरु आहे. अशात रवींद्र धंगेकर यांच्यासाठी बनवण्यात आलेल्या गाण्यामुळे सध्या नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पहा संपूर्ण गाणे

https://youtu.be/bCQ5AVdRkgE


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने