Rohit Pawar Ram Shinde : जामखेडकरांचा कर्जतकरांच्या पावलावर पाऊल, बाजार समितीचा 'इक्वल रिझल्ट'



विक्रम बनकर, नगर : दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने चुरशीच्या ठरलेल्या जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटाला समसमान म्हणजे प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे कर्जतकरांनी सुद्धा दोन्ही आमदारांवर विश्वास टाकून समान जागा दिल्या होत्या. त्यामुळे जामखेडकरांनी कर्जतकरांच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, आता बहुमतासाठी फोडाफोडीमुळे पुन्हा पुढील राजकारण रंगणार आहे.

विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनल आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकार शेतकरी पॅनल यांच्यात ही लढत झाली. दोन्ही दिग्गज आमदार असल्याने जामखेड बाजार समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.  प्रत्यक्षात मतदारांनी संमिश्र कौल दिल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कोणालाच बहुमत मिळाले नाही.

असा आहे निकाल

एकुण १८ उमेदवार रिंगणात 

त्यापैकी आघाडी रोहित पवार गटाचे ९ उमेदवार विजयी

तर भाजप राम शिंदे गटाचे ९ उमेदवार विजयी

कर्जत प्रमाणेच जामखेडचा निकाल

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने