विक्रम बनकर, नगर : आमदार राणे यांनी नगर शहरात येऊन आमदार संग्राम जगताप यांच्या बद्दल वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा आमदार संग्राम जगताप यांनी चांगला समाचार घेतला स्वाभिमान गहाण ठेवणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये त्या आमदाराची उंची माझ्या शर्टच्या दुसऱ्या बटनापर्यंतच आहे. स्वाभिमान विलीन केलेला आमदार नगर शहरात आला त्यांच्या उंचीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते माझ्या शर्टचे दुसऱ्या बटनापर्यंतच आहेत .त्यामुळे आमची नजरा नजर होत नाही जरा नजर मिळवायचे असेल त्यांनी मला सांगावे त्या ठिकाणी मी यायला तयार आहे.स्वाभिमान विलीन केलेल्या आमदाराच्या कुटुंब बाबतीत माहिती घेतली तर 2016साली तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी 20 जुलै 2016 च्या विधानपरिषदेचे सभागृहांमध्ये अनेक काही गोष्टींचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला त्यांची पार्श्वभूमी संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.आमदाराच्या कुटुंबाचा इतिहास काय आहे ते सर्वांना माहीत आहे कोणीही अशी भाषा नगर शहरांमध्ये वापरण्याची हिंमत करू नये अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा