Sanjay Raut : अजित पवारांच्या विधानावर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…



ब्युरो टीम : 'अजित पवार आणि माझ्या चांगले संबंध आहेत. आम्ही परवा एकाच टेबलवर बसून जेवलो आहोत. अजित पवार हे गोड माणूस आहेत. जर, अजित पवार रागावले असतील, तर चालेल. माणसाने मन मोकळं केलं पाहिजे,' असं वक्तव्य करीत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यासोबत सुरू झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि  संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक रंगली आहे. आज अजित पवारांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ‘कोण संजय राऊत?’, असं उत्तर अजित पवारांनी दिलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत म्हणाले,'अजित पवार आणि माझ्यात कोणताही वाद नाही. पवार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तिशी माझा वाद नव्हता आणि नाही. अजित पवार हे महाविकास आघाडीतील प्रमुख स्तंभ आणि नेते आहेत. भाजपा लावालावी करण्याचं काम करत असेल. तर तुमचा डाव यशस्वी होणार नाही. खारघरमध्ये पन्नासच्या आसपास साधकांचा मृत्यू झाला आहे. त्याची स्वतंत्र्यपणे चौकशी व्हायला हवी. अजित पवारांनी न्यायालयीन चौकशी मागणी केली आहे. त्याचबरोबर नाना पटोलेंनी खारघर घटनेवर चर्चा करण्यासाठी विधानसभा अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहेत. ते सुद्धा बोलवण्यात आलं पाहिजे,' असंही  राऊतांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने