Sharad pawar : शरद पवारांना हवा तसा कारभार राज्यसरकार करेल, भाजप नेत्याचं मोठं विधान



ब्युरो टीम :राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बोलताना अलिकडच्या काळात संभाजीनगरला काही प्रकार घडला मुंबईतील मालवणीतही काही प्रसंग घडला. या दोन्ही ठिकाणी राज्यातील परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागली असं वक्तव्य केलं होतं. दोन्ही घटनेला धार्मिक स्वरूप आहे का असं वाटायला लागलं आहे, असंही शरद पवार यांनी म्हंटलं होतं.

शरद पवार यांच्या या विधानावर भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी चिंता व्यक्त करू नये. त्यांना अभिप्रेत

असलेला राज्यकारभार लवकरच दिसेल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. बोलताना संयम असावा. कुणाचीही मन दुखतील असं बोलायला नको असं मला वाटतं. पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकार त्यांचं राहिलेलं नाही. त्यांचं सरकार असताना लोकांना जास्त चिंतीत टाकलं होतं. चिंताग्रस्त लोकं होती.

कारण राज्याला मुख्यमंत्रीच नव्हता. तुम्ही म्हणाला उद्धव ठाकरे कोण होते? तर ते फक्त मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, अशी टीका करतानाच शरद पवार यांना अभिप्रेत असं राज्य आणि कारभार लवकरच दिसेल, असं नारायण राणे यांनी म्हंटलं आहे.काय म्हणाले होते शरद पवार ?“अलीकडच्या काळात संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे काही प्रकार घडले आहेत. या दोन्ही ठिकाणी धार्मिक स्वरूप आहे की काय? अशी चिंता वाटण्याची स्थिती होती.”

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने