Sppu : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फूडमॉलमधील दुकानामधून दिले जाते घाणीतले जेवण




ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फुडमॉल मध्ये वेगवेगळी खाद्य दुकाने आहेत . या सर्व दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे  दिसून आले आहे . आज विद्यार्थी नाष्टा आणि जेवण करण्यासाठी गेले असता एक गंभीर बाब त्यांच्या लक्षात आली आहे . फुडमॉल मधील Just Eggs व Route 93 या दोन्ही दुकानामधील कर्मचारी पांढरा भात [ राईस ] शौचालयाच्या शेजारी उघड्यावर वाळत घालत असताना दिसून आला  . हा भात तपासून पहिला असता तो रात्रीचा शिळा भात असल्याचे लक्षात आले . ही बाबा अतिशय गंभीर असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम हे दुकानदार करत आहेत . विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका पोहोचवण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक शौचालयाच्या शेजारी उघड्यावर राईस व इतर पदार्थ ठेवून शरीरास बाधा होईल असे कृत्य वारंवार केले जात आहेत . विद्यापीठ प्रशासनाने संबंधित दुकानावर   तात्काळ फौजदारी  कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलावित  व त्यांचा परवाना रद्द करावा . अन्यथा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या विरोधात लवकरच तीव्र आंदोलन करण्यात  येणार असल्याचे  विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे सदस्य राहुल ससाणे यांनी म्हटले  आहे. 

                

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने