Sujay vikhe :'मविआ' ने सातत्याने स्वातंत्र्यावीरांचा अवमान केला, डॉ.सुजय विखेंचा गंभीर आरोप

 


विक्रम बनकर, नगर : महाविकास आघाडी कडून राज्यात ठिकठिकाणी वज्रमुठ सभा घेण्याचे नियोजन केले जात असतानाच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून भाजप नेते खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 'महाविकास आघाडीने सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला,' असा गंभीर आरोप विखे पाटलांनी केला आहे. नगर शहरात भाजपा आणि शिवसेनेच्या वतीने  आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने ते बोलत होते. 

'स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान हे महाराष्ट्राला माहित आहे. पण ते सांगण्यासाठी आज यात्रा काढावे लागते, यापेक्षा मोठी दुर्दैवी बाब महाराष्ट्रात नाही,' असे सांगत विखे पाटील म्हणाले, 'महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला गेला. काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष यांनी तीनदा सावरकरांचा अपमान केला,. यामधून त्यांच्या विचारात, कृतीत देशाबद्दल, स्वातंत्र्य सैनिकांविषयी काय भावना आहेत, ते दिसून येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसचे नेते अपमानस्पद बोलतात. पण त्यानंतरही त्यांच्या मांडीला मांडी लावून माजी मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते वज्रमुठ तयार करण्याचा प्रयत्न करतात. ज्या व्यासपीठावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होतो, अशा व्यासपीठावरच महाराष्ट्राचा विकास करण्याच्या घोषणा केल्या जातात, हे हास्यस्पद आहे. 'मविआ'ला त्यांची जागा येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील रहिवासी दाखवल्याशिवाय राहणार नाही,' असेही ते म्हणाले.                                                                                      दरम्यान, चौपाटी कारंजा चौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. 
या गौरव यात्रेत भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे,अभय आगरकर,वसंतराव लोढा, सुवेंद्र गांधी,दिलीप सातपुते, अनिल शिंदे, बाबूशेट टायरवाले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, धनंजय जाधव ,   सुरेखा विदये, शशांक कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, महेश नामदे, विवेक नाईक , बाबासाहेब गायकवाड आणि महिला पदाधिकारी  मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

पहा व्हिडिओ



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने