ब्युरो टीम: महाराष्ट्रात 28 मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली. 28 मे हा स्वातंत्र्यवीर यांचा जन्मदिवस दिवस
आहे. याचं औचित्य साधून 28 मे हा जन्मदिवस
राज्य शासनातर्फे 'स्वातंत्र्यवीर
गौरव दिवस' म्हणून साजरा केला जाणार
असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन जाहीर केलं. या निमित्ताने
सरकराकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. स्वातंत्र्यवीर गौरव दिवस
साजरा करण्याचा प्रस्ताव कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी ठेवला होतो, जो सरकारने स्वीकारला आहे.
स्वातंत्र्यवीर
सावरकरांचा जन्मदिवस स्वातंत्र्यवीर गौरव दिवस म्हणून साजरा होणार!
मुख्यमंत्र्यांनी
ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "देशाच्या
स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र
उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान असून त्यांना अभिवादन
करण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन'
साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर
सावरकर यांच्या विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार
आहेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती,धैर्य,प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली
होती."
टिप्पणी पोस्ट करा