Tdm : टी डी एम चित्रपट प्रदर्शित, डॉ. किरण गाढवे यांची उत्तम कथा, सुंदर संवाद

 


ब्युरो टीम : काल दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी *TDM* हा मराठी चित्रपट महाराष्ट्रातील  सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे . या चित्रपटाची  कथा, पटकथा, संवाद (script) लेखन  आमचे मित्र आणि विद्यापीठाच्या मराठी विभागातील विद्यार्थी प्रा. डॉ . किरण गाढवे यांनी केले आहे . सोबतच यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची भूमिका देखील केलेली आहे. ख्वाडा, बबन या गाजलेल्या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी [ राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त ] या चित्रपटाचे दिग्दर्शन  केले आहे . आपल्या विद्यापीठातील एक विद्यार्थी चित्रपट माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे . विद्यापीठ तसेच विभागाचे नाव मोठे करतो आहे . त्याला आपण सर्वजण शुभेच्छा देऊया . आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पहा . 

#मराठी_चित्रपट 

#आपला_माणूस_आपला_चित्रपट 

#TDM

                  

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने