ब्युरो टीम : ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर एलन मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आता फ्री मध्ये मिळणारी ब्लू टिक सर्विस पेड करण्यात आली असून ज्यांनी पैसे मोजले नाहीत अशा सर्व लोकांची ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे.
ट्विटरची मालकी मिळवल्यानंतर एलन मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. आता फ्री मध्ये मिळणारी ब्लू टिक सर्विस पेड करण्यात आली असून ज्यांनी पैसे मोजले नाहीत अशा सर्व लोकांची ब्लू टिक काढून टाकण्यात आली आहे.
एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीमध्ये अनेक मोठे बदल केले जात आहेत. सर्वात मोठा बदल म्हणजे 'ब्लू टिक' सबस्क्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीचे नवीन मालक मस्क यांनी स्वत: 2 ऑक्टोबर रोजी ट्विटरवर ब्लू टिकची किंमत जाहीर केली होती. त्यांनी सांगितले होते की Twitter वर महिन्याला जवळपास ८ डॉलर्स खर्च करावे लागणार आहेत. यासोबतच मस्कने ट्विटर ब्लूच्या नवीन व्हर्जनमध्ये आणखी फीचर्सही आणले आहेत.
दरम्यान, ट्विटरने इतकं मोठं पाऊल उचलण्यामागे एक मोठं कारणंही आहे. ट्विटरचे नवीन मालक एलन मस्क यांनी काही काळापूर्वीच ट्विटर ४४ बिलियन डॉलर (सुमारे ३,३६,९१० कोटी रुपये) खर्च करून विकत घेतलं होतं. दरम्यान त्यानंतर कंपनीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने ही सब्सक्रिप्शन सेवा मस्क यांनी आणली आहे.
टिप्पणी पोस्ट करा