ब्युरो टीम: सध्या
जेपीसीवरून राजकारण तापलं आहे. अदानी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नसल्याचं
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या
वक्तव्यामुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाची अडचण झाली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर
आता खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेबांनी अदानी
यांचं समर्थन का केलं? हे त्यांच्यासोबत बैठक घेऊनच समजून घ्यावं
लागेल असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. उदयनराजेंचा पवारांना टोला शरद पवारांनी
अदानी यांचं समर्थन का केलं या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे यांनी शरद
पवारांना खोचक टोला लगावला आहे.
शरद पवारांनी अदानींचं
समर्थन का केलं हे त्यांच्यासोबत बैठक घेऊनच समजून घ्यावं लागेल असं उदयनराजे
यांनी म्हटलं आहे. काय म्हटलं होतं पवारांनी? अदानी प्रकरणात जेपीसी
नियुक्त करावी अशी मागणी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
मात्र जेपीसीची आवश्यकता नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. जेपीसीमध्ये
सत्ताधारी गटाचेच अधिक नेते असतील त्यामुळे तिचा काहीही उपयोग होणार नाही. परंतु
तरीही करायची असेल तर करा माझं काही म्हणणं नाही, अशी भूमिका शरद पवार
यांनी घेतली आहे
टिप्पणी पोस्ट करा